201+ Traditional ukhane in marathi for Female & Male – स्त्रियांसाठी मराठी उखाणे

201+ Traditional ukhane in marathi for Female & Male – स्त्रियांसाठी मराठी उखाणे

 

Traditional ukhane in marathi for Female : –  Marathi ukhane, Ukhane , Marathi ukhne for Female, Marathi ukhne for male, Moderan marathi  ukhane for female, Ukhane marathi for male, Ukhane marathi for Female, Traditional ukhane in marathi for Female.

 

Traditional ukhane in marathi for Female

 

Marathi Ukhane for Female हे खास नवरीकरिता बनवण्यात आले आहेत. हे समजायला आणि बोलायला फार सोपे आहेत. हे उखाणे घेतले तर तुमचे पती आणि पाहुणे मंडळी नक्कीच खुश होणार. हे उखाणे खास महिलांकरिता आहेत.

महिला उखाणे घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. नवीन प्रकारचे उखाणे तुम्हाला पहायला मिळतील.  Marathi Ukhane for female तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत शेयर करू शकता. तुम्हाला या वेबसाइट वर सर्व प्रकारचे उखाणे भेटतील.

 

Traditional Marathi Ukhane for Female (नवरीसाठी पारंपरिक मराठी उखाणे)

श्री गणेश आहे शिव पार्वती चा पुत्र, ….रावांच्या नावाचे घालते मंगळसुत्र.

* श्री गणेश आहे शिव पार्वती चा पुत्र, ….रावांच्या नावाचे घालते मंगळसुत्र. * 

* जाईजुईच्या झाडाखाली नाग नागिन ची वस्ती……
रावांच्या औक्ष मागते माझ्यापेक्षा जास्ती.

* गोठ केल्या पाटल्या केल्या आरसापेठी करायची ………
च्या नावाला मागे नाही सरायची.

* नेहरू मेले स्वर्गी गेले दुःखी झाली इंदिरा…….
नाव घेते मांडवाच्या मंदिरा.

* पंढरपुरात आहे रुक्मिणी अन् विठोबा,…….
रावांचे नाव घेते कार्यक्रमाला आली शोभा.

* चारशे दिले गाईला 200 दिले दाव्याला……
ने बहीण दिली …… च्या सेवेला.

* श्रेष्ठ होते कुंतीचे पुत्र पांडव, घालते मांडव.……
रावांचे नाव घेते. लग्नाचा घालते मांडव.

* देवापाशी ठेवते भरली घागर, …..
रावांचे नाव घेते वाण करण्यासाठी जावे गंगा सागर.

* काळा चंद्रकळा त्याला नेसण्याची खुबी …….
रावांची मूर्ती माझ्या हृदयात उभी.

* काळा चंद्रकला त्याला खसखशीची चांदण्या………
रावांचं नाव घेते…….. ची कन्या.

* राम राज्यात मारले रावण कृष्ण राज्यात खाल्ले दही…….. रावांच्या अंगठी वर माझी सही.

* रुसव्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास……
रावांच नाव घेते तुमच्या करता खास.

* राम गेले वनवासात सीता जाते पाठी………
नाव घेते खास विड्यासाठी.

* आशीर्वादाची फुले वेचते वाकून…….
नाव घेते तुमचा मान राखून.

* रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध होतो मोहित……..
नाव घेते दोन्ही मुलासहित.

* संक्रांतीच्या दिवशी तिळला येते गोडी …….
रावांच्या जीवावर वापरले वापरते म्हणी मंगळसूत्राची जोडी.

* सातारा गाव त्यांगले त्यांगल्यात बंगले बंगल्याला घर, दाराला कड्या कड्याला कुलपे, कुलपाला याच्या नाव घे मुली, माशा समया लावल्या 360. एक समई मोराची…….. रावांच नाव घेते कन्या आहे…….. ची.

* तीळ तांदूळ पिकतात मावळात……..
नाव घेते गणपतीच्या देवळात.

* जाई जुई च्या झाडाखाली नाग नागिन घेते विसावा ……रावांच्या नावाला आशीर्वाद असावा.

* नेहरू मेले स्वर्गी गेले दुःखी झाली इंदिरा…….
नाव घेते मांडवाच्या मंदिरा.

* रामाने राज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्ती ने……
रावांच नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.

* प्रेम आणि विश्वासाचे प्रतिक आहे मंगळसूत्र, ……
रावांचे नाव घेते कृष्ण आहे देवकी चा पुत्र.

* गोट केल्या पाटल्या केल्या मध्ये भरते दालच्या……..
रावांच्या नावा लागतात तेलच्या.

 

 

 

Moderan marathi  ukhane for female

 

 

Marathi Ukhane for Female । Marathi Ukhane for Bride (मुलींसाठी / नवरीसाठी मराठी उखाणे)

 

Marathi Ukhane for Female । Marathi Ukhane for Bride

* वसंतातली डाळपन्हे देती थंडावा ……..
रावांच्या सहवासात मला आपला आशीर्वाद हवा.

* फुलात फुल मदनबाण ……..
राव माझे जीव कि प्राण.

* दिवसापाठी रात्र येते हा पाठशिवणीचा खेळ………
रावांचा वृक्ष तेथे माझे जीवन वेल.

* सोन्याच्या ताटात चांदीचा घास, माहेरच्या तांदळाला बासमतीचा वास ….रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास.

* सोन्याचे ताट,चंदनाचा पाट, पंचपंक्वानांचा थाटमाट……… रावांचा नाव घेते सोडा माझी वाट.

* विद्यादायिनी, विद्यावर्धिनी, शुभ्रवस्त्राधारिणी, वीणावादीनी, शुभ्राहंसवासिनी सरस्वतीच्या वीणावादनावर थुई थुई नाचतो मोर ….. रावांचे नाव घेते वडिलधाऱ्यांसमोर.

* गणपतीच्या सोंडेला शेंदुराचा रंग…..
राव असतात नेहमी कामात दंग.

* मातापित्यांचे कर्तव्य संपले कर्तव्याला झाली माझ्या सुरुवात ……रावांचे सहकार्य लाभो माझ्या जीवनात.

* मनाच्या वृंदावनात डोलते भावनेची तुळस …..
रावांच नाव घ्यायला मला नाही आळस.

* कपाटाच्या खणात ठेवला पैका …….
रावांच नाव घेते सर्वजण ऐका.

* नूतन वर्षाचा शुभारंभ करिन येतो पाडवा …….
रावांच्या सान्निध्यात राहो सदैव गोडवा.

* बारा वर्षे तुळशीला नेमाने घातले पाणी ……..
रावांची झाले मी राणी.

* सगवणी पेटीला सोन्याची चुक ….
रावांच्या हातात कायद्याचे बुक.

* शिक्षणाने विकसित होते संस्कारिक जीवन …….
च्या संसारात राखीन सर्वांचे मन.

* लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती …….
पती मिळाले म्हणून भाग्य मानू किती.

* वाकून नमस्कार करताना दिसते स्त्रीची शालीनता…….
रावांच्या हास्यात दिसते जीवनाची सफलता.

* सौभाग्याचं लेणं, काळ्या मण्याची पोट …….
च्या जीवनात उजाळीन जीवनज्योत.

* अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य ……..
रावांचा आनंद हेच माझे सौख्य.

* देवापुढे लावला ऊद, वास सुटला छान……
रावांचे नाव घेते ऐका देऊन कान.

* सायंकाळच्या वेळी मनस्कार करते देवाला……
चे नाव घेताना आनंद होतो मनाला.

* आरशाची खोली तिथे सोन्याची दिवली…….
ना पहाताच तहान भूक निवली.

* रूप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा…….
चे नाव घेऊन आशिर्वाद मागते सर्वांचा.

* प्रेमळ शब्दांमागे पण भावना असते कौतुकाची ….
रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची.

* शब्द तिथे नाद, कवि तिथे कविता……
माझे सागर मी त्यांची सरिता.

* चंदनाच्या देव्हाऱ्यात सोन्याचे देव, देवाने दिली मला हिऱ्यांची ठेव, हिऱ्यांच्या ठेवीहून थोर पतीदेव,……. रावांचं नाव घेते करताना हळदीकुंकवाची देवघेव.

* सावित्रीच्या पातिव्रत्याने सत्यवानाला लाभे जन्म……
रावांचे सौभाग्य लाभो जन्मोजन्म.

* संध्यासमयास आतुरलेले जीव घरी घेतात धाव सर्वांच्या आग्रहास्तव घेते ….. . रावांचे नाव.

* संसाराचे टिपण हृदयाच्या वहीत……
ना आयुष्य मागते सुदृढ आरोग्यासहित.

* आकाशात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी……
च्या साथीने चढते संसाराची पायरी.

* जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने …….
रावांचे नाव घेते खऱ्याखुऱ्या प्रेमाने.

* सुख समाधान, शांती तेथे देवाची वस्ती ……….
ना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती.

* निळ्या-निळ्या आकाशात शोभून दिसतात चंद्र-तारे………रावांच्या संगतीने उजळले जीवन सारे.

* मनाला समाधान देते देवापुढची सांजवात संसाराच्या सुखी वाटचालीकरिता. .रावांच्या हाती दिला हात.

* संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती……
रावाशी लग्न झाले, झाली इच्छापूर्ती.

* गरिबीची करू नये निंदा, श्रीमंतीचा करू नये गर्व………
च्या नावावर अर्पिले जीवन सर्व.

* चांदीच्या तबकात ठेवले नवसाचे पेढे . …..
रावांच्या दर्शनाने मन झाले वेडे.

* हृदयात असावे प्रेम, प्रेमात असावी निष्ठा निष्ठेत असावी कृती, कृतीत असावी कला……… च्या संसारात काय कमी मला.

* पायातल्या जोडव्यात माहेरची स्मृती, मिळाले…….
पती म्हणून आभार मानू किती.

* गुलाबाचे फुल देवीला वाहिले ……
रावांच्या साथीने मी संसारात रमले.

* संसाररूपी सागरात प्रीतीच्या लाटा……
च्या सुखदुःखात उचलीन अर्धा वाटा.

* संसार करावा नेटका आणि युक्तीने …….
रावांचे नाव घेते अपार भक्तीने.

* संसाररूपी सागरात प्रेमरूपी सरोवर आयुष्याचा प्रवास करते….. रावांच्या सोबत.

* वसंत चाहुली हळदीकुंकू करतात सुवासिनी…….
रावांनी भरला आनंद जीवनी.

* चंद्राचा उदय, समुद्राला भरती, …….
च्या शब्दाने सारे श्रम हरती.

* सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले………
च्या संसारात भाग्य माझे हसले.

* सावित्रीच्या पातिव्रत्याने सत्यवानाला मिळाला पुनर्जन्म …. रावांचे सौभाग्यछत्र लाभो जन्मोजन्म.

* माहेर सोडताना पावलं होतात कष्टी …….
च्या संसारात करीन सुखाची वृष्टी.

* महादेवाला वाहतात बेल, कृष्णाला तुळशी ……….
रावांचे नाव घेते च्या दिवशी.

* किनखापांची गादी त्याला भरगच्च रेशमी लोड …….
रावांचे बोलणे अमृतासारखे गोड.

* स्त्रीला भूषविते तिची शालिनता………..
रावांच्या जीवनात करीन कर्तव्याची पूर्तता.

* नव्या दिशा नव्या आशा, नव्या घरी पदार्पण, …….
च्या जीवनी माझे सर्वस्व अर्पण.

* आला आला रुखवत त्यात होते लाडू, लाडवात होते मोतीचूर, मोतीचूर झाले खुसखुशीत,……. रावांचं नाव घेते येऊन भलत्या खुशीत.

* अत्तरदाणी गुलाबदाणी माळ घातली विडे ठेवले करून,…….. रावांना माळ घातली कुलस्वामिनीला स्मरून.

* स्वाती नक्षत्रातील थेंबाचे शिंपल्यात होती मोती ………
राव मिळाले पती म्हणून ईश्वराचे आभार मानू किती.

* रूप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा …..
चे नाव घेऊन आशिर्वाद मागते सर्वांचा.

* यज्ञ, धर्म, कीर्ती, ऐश्वर्य आणि संपत्ती …….
चे यश हीच माझी स्वप्नपूर्ती.

* उगवला सूर्य मावळली रजनी, ………
चे नाव सदैव माझ्या मनी.

* नूतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडवा ……
रावांच्या सान्निध्यात राहो सदैव गोडवा.

* श्यामल वर्ण मेघातून कोसळतात मोत्यांच्या सरी …..
रावांचं नाव घेते आले मी सासरी.

* लहानशा भिंती चित्र काढू किती सासूबाईंच्या पोटी….
राव आहेत मोठी.

* जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने ….
रावांचे नाव घेते बायको या नात्याने.

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top