Modern marathi ukhane for female आधुनिक उखाणे – Modern ukhane in मराठी 

Modern marathi ukhane for female आधुनिक उखाणे – Modern ukhane in मराठी

Modern marathi ukhane for female: ( स्त्रीसाठी आधुनिक मराठी उखाणे) Modern Marathi ukhane for female: लग्न म्हटले कि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये इतर तयारीसोबत उखाण्यांची (Marathi ukhane)  सुद्धा तयारी करायला लागते. लग्नामध्ये नवऱ्याने आणि नावरीने एकमेकांचे उखाण्यात नाव घेणे ही परंपरा खूप जुनी आहे. आणि या उखाण्यांची मज्जाच वेगळी असते.

Modern Marathi ukhane for female funny, latest Marathi ukhane for female, lover modern Marathi ukhane for female, Romantic lover modern marathi ukhane for female, Marathi ukhane for female list,  latest marathi ukhane for bride.

या साठीच आम्ही या लेखामध्ये काही Modern Marathi Ukhane घेऊन आलो आहोत. तर लग्नाच्या तयारीसोबत या पोस्ट मधील लेटेस्ट Latest Marathi ukhane सुद्धा नक्की एकदा वाचून जा.
तुम्हाला तर का या पोस्ट मधील Marathi Ukhane आवडले तर तुमच्या मैत्रिणींसोबत हि पोस्ट नक्की शेअर करा. जेणेकरून तुम्हाला या मनोरंजनाचा आणि विनोदांचा आनंद घेता येईल.

 

lover modern marathi ukhane for female

Modern marathi ukhane for female funny

Funny Ukhane हे खास वधू आणि वरासाठी बनवले गेले आहेत. हे अतिशय कॉमेडी आहेत. तुम्हाला वाचायला नक्की आवडतील. उखाणे हे लग्नात घेणे आवश्यक आहे. नवीन नवरी जेव्हा गृहप्रवेश करते तेव्हा उखाणे हे घ्यावेच लागतात. Funny Ukhane हे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेयर करू शकता. उखाणे घेणे हे नवरीला फार आवडते. मुलींसाठी आपल्या पतीचे नाव सर्वांसमोर घेण्याची हि पहिलीच वेळ असते.

 

* गल्लीतील लोक, प्रेमाने हाक मारतात अंड्या, _____
आहे माझा, हार्दिक पंड्या.
* भारताचा कर्णधार, विराट कोहली आहे ऑलराऊंडर,____________
आहेत डॉक्टर, आणि मी त्यांची कंपाऊंडर.

* छान बनवतो, नाक्यावरचा अण्णा इडली डोसा, _____
राव आहेत बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा.

* व्हीस्की पेक्षा, छान आहे वोडका, ________
आपल्या लग्नानंतर, भाजी बनवेल मी दोडका.

* नवरात्रीमध्ये गरबा खेळताना, झाली पहिली भेट,_________
रावांची झाली, मी बायको सेट.

* उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन,________
राव आहेत, माझे मोठे फॅन.

* प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास,पण_______
रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास.

* हजार कमी पडतात, लाखाशिवाय बात नाही, _______ रावांचा FB वर फोटो लाईक केल्याशिवाय, पोरी राहत नाही.

* आवाज ऐकू येत नाय तर, करा साफ कान, _______
रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.

* दारूच्या नावाने, नेहमी असते बोंब, ______
अहो कमी प्या, नाहीतर येतील कोंब.

* खुर्चीत खुर्च्या, प्लास्टिकच्या खुर्च्या,_______
रावांच्या बहिणी, जशा खुरासणी मिर्च्या.

* मला नाही वाटत पाल, कॉक्रोच ची भीती, _______
आहेत माझे कबीर सिंग, आणि मी त्यांची प्रिती.

* लग्न करण्याच्या आधी, खूप केले होते वादे, ________
राव दिसतात, तेवढे नाही आहेत साधे.

* उष्णता खूप वाढली म्ह्णून, ह्यांनी आणली कुल्फी,__________
रावांसोबत काढते आज, सर्वांसमोर सेल्फी.

* फालुदा छान लागतो, जेव्हा असतो त्यात सब्जा,________
रावांच्या जीवावर, करेन मी मज्जा.

* बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण _________ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

* पिऊन आल्यावर, अंगात येतो खूप जोश, मला बघताच,_______
रावांचे उडतात होश.

* कोकणात जाताना, गाडीत बसतात खूप हादरे, ________ रावांचे नाव घेते, आहेत खूप पादरे.

* _________ रावांना आहे, नोकरी सरकारी,
म्हणून तर मी घेऊ शकले, उंच भरारी.

* तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे, ______
रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.
* कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल,________
राव आहेत, माझ्यासाठी पागल.

* प्रत्येक नाक्यावर भेटते, सिग्रेट आणि चहा ची टपरी,_______
राव आहेत, एक नंबर चे छपरी.

* बोलणे आहे ह्यांचे, मधापेक्षा गोड, _____
राव काढतात नेहमी, मुलींची खोड.

* पाहुणे आहेत वरातीमदे, पिऊन तराट, ________
च नाव घेऊन, प्रवेश करते घरात.

* चहा सोबत लागतो, चांगला मस्का पाव. _______
रावांची बाहेर किती लफडी, ते विचारू नका राव.

* ताटात होती जिलेबी, त्याला लागली मुंग्यांची रांग, _____ रावांचे नाव घेते, तुमच्या नानाची टांग.

* कारल्याची भाजी, लागते खूप कडू, _______
रावांचे प्रवचन ऐकून, लागतात कान सडू.

* नळावर पाणी भरताना, मारायचे लाईन, ______
रावांनी अखेर केले, कोर्ट मॅरेज करून पेपर साईन.

* आय लायनर लावला कि, मुली दिसतात छान, ________ राव नेहमी, माझा मेकअप करतात घाण.

* गाजर खायला, आवडते सशाला, _______
च नाव घ्यायला, आग्रह कशाला.

*हाताची घडी , तोंडावर बोट, _______
डोकं नसेल चालत, तर मारा एक व्हिस्की चा घोट.

 

 

lover modern marathi ukhane for female

 

 

romantic lover modern marathi ukhane for female

 

marathi ukhane for female list

 

🔸काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, …..
रावांच्या जीवनात निर्माण करीन आनंद

🔸शुभ मंगल प्रसंगी सर्वजण करतात आहेर, ………
च्या जीवनाकरिता सोडले मी माहेर.

🔸आकाश आले भरुन, चंद्र लपला ढगात, …………
ना हार अर्पण करून धन्य झाले जगात.

🔸विहिरी भरल्या काठोकाठ नदीला आला पूर, …………
च्या साठी आई-वडिल केले दूर.

🔸सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ, ………..
पती मिळाले जीवन झाले कृतार्थ.

🔸निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान, ………….
चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.

🔸गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी, ……..
रावांच नाव घेते ……..दिवशी,

🔸प्रेमरूपी संसार, संसार रूपी सरिता, ………….
चं नाव घेते खास तुमच्याकरिता.

🔸भारताच्या नकाशाला मोत्याचे तोरण, ……..
चं नाव घ्यायला…….कारण.

🔸चांदीच्या तबकात निरंजन आरती, …….
च्या जीवनात …….. सारथी.

🔸भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवतगीता, …………
नाव घेते सर्वांच्याकरिता.

🔸कमळाच्या फुलांचा हार, लक्ष्मीच्या गळ्यात, ………
चं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात.

🔸मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण, ……..
साठी मागितले दीर्घायुष्याचे दान,

🔸मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते, …………
चे पत्नी पद अभिमानाचे मिरवते.

🔸नागपूरची संत्री, जळगावची केळी, …………
रावांचं व माझे ‘शुभमंगल’ झालं गोरज मुहूर्ताच्या वेळी.

🔸उभी होते तळ्यात, नगर गेली मळ्यात,…….
हजाराची कंठी, …………. रावांच्या गळ्यात.

🔸नेत्रदीप निरंजन दिसे तेजोमय, ……….
च्या सहवासात जीवन झाले सुखमय.

🔸शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता, ………..
सारखे पती मिळाले स्वर्ग आला हाता.

🔸रिद्धी सिद्धी दाता मंगल कार्याला आला, ………..
चं नाव घेते ……..सणाला

🔸आशिर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा, …………
चा व माझा संसार आहे सुखाचा.

🔸भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी, ……….
चं नाव घेते ………. दिवशी.

🔸संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी, ………
च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.

🔸सुमुहूर्तावर संसार सागरात पदार्पण केलं,
जीवन नौकेच सुकाणू,……..च्या हाती दिले.

🔸सतारीचा नाद, वीणा झंकार, ………..
च्या जीवावर घालते मंगळसूत्राचा अलंकार.

🔸दह्याचे करतात श्रीखंड, दूधाचा खवा, ……..
चं नाव घेते नीट लक्षात ठेवा.

🔸प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती आठवावी संतजनाची, त्याग जाणावा राम सीतेचा,…….
नाव घेते आशिर्वाद द्या अखंड सौभाग्याचा.

🔸तिरंगी झेंड्याला वंदन करतात वाकून, ……..
रावांचं नाव घेते तुमचा मान राखून,

🔸आई-वडिल, भाऊ-बहीण यांच्या सहवासात वाढले, ……….
मुले मला सौभाग्य चढले.

🔸दारातील तुळशीला पाणी घालते गार, ……..
रावांच्या नावाला रात्र झाली फार.

🔸दारातील तुळशीला पाणी घालते गार, …….
रावांच्या नावाला आग्रह नको फार.

🔸सुख समाधान, शांति हेच माझे माहेर, ………
रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

 

 

latest marathi ukhane for bride

 

* वसंतातली डाळपन्हे देती थंडावा ……..
रावांच्या सहवासात मला आपला आशीर्वाद हवा.

* फुलात फुल मदनबाण ……..
राव माझे जीव कि प्राण.

* दिवसापाठी रात्र येते हा पाठशिवणीचा खेळ………
रावांचा वृक्ष तेथे माझे जीवन वेल.

* सोन्याच्या ताटात चांदीचा घास, माहेरच्या तांदळाला बासमतीचा वास ….रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास.

* सोन्याचे ताट,चंदनाचा पाट, पंचपंक्वानांचा थाटमाट……… रावांचा नाव घेते सोडा माझी वाट.

* विद्यादायिनी, विद्यावर्धिनी, शुभ्रवस्त्राधारिणी, वीणावादीनी, शुभ्राहंसवासिनी सरस्वतीच्या वीणावादनावर थुई थुई नाचतो मोर ….. रावांचे नाव घेते वडिलधाऱ्यांसमोर.

* गणपतीच्या सोंडेला शेंदुराचा रंग…..
राव असतात नेहमी कामात दंग.

* मातापित्यांचे कर्तव्य संपले कर्तव्याला झाली माझ्या सुरुवात ……रावांचे सहकार्य लाभो माझ्या जीवनात.

* मनाच्या वृंदावनात डोलते भावनेची तुळस
…..
रावांच नाव घ्यायला मला नाही
आळस.

* कपाटाच्या खणात ठेवला पैका …….
रावांच नाव घेते सर्वजण ऐका.

* नूतन वर्षाचा शुभारंभ करिन येतो पाडवा …….
रावांच्या सान्निध्यात राहो सदैव गोडवा.

* बारा वर्षे तुळशीला नेमाने घातले पाणी
……..
रावांची झाले मी राणी.

* सगवणी पेटीला सोन्याची चुक
….
रावांच्या हातात कायद्याचे बुक.

* शिक्षणाने विकसित होते संस्कारिक जीवन …….
च्या संसारात राखीन सर्वांचे मन.

* लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती …….
पती मिळाले म्हणून भाग्य मानू किती.

* वाकून नमस्कार करताना दिसते स्त्रीची शालीनता…….
रावांच्या हास्यात दिसते जीवनाची सफलता.

* सौभाग्याचं लेणं, काळ्या मण्याची पोट …….
च्या जीवनात उजाळीन जीवनज्योत.

* अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य ……..
रावांचा आनंद हेच माझे सौख्य.

* देवापुढे लावला ऊद, वास सुटला छान……
रावांचे नाव घेते ऐका देऊन कान.

* सायंकाळच्या वेळी मनस्कार करते देवाला……
चे नाव घेताना आनंद होतो मनाला.

* आरशाची खोली तिथे सोन्याची दिवली…….
ना पहाताच तहान भूक निवली.

* रूप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा…….
चे नाव घेऊन आशिर्वाद मागते सर्वांचा.

* प्रेमळ शब्दांमागे पण भावना असते कौतुकाची ….
रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची.

* शब्द तिथे नाद, कवि तिथे कविता……
माझे सागर मी त्यांची सरिता.

* चंदनाच्या देव्हाऱ्यात सोन्याचे देव, देवाने दिली मला हिऱ्यांची ठेव, हिऱ्यांच्या ठेवीहून थोर पतीदेव,……. रावांचं नाव घेते करताना हळदीकुंकवाची देवघेव.

* सावित्रीच्या पातिव्रत्याने सत्यवानाला लाभे जन्म……
रावांचे सौभाग्य लाभो जन्मोजन्म.

* संध्यासमयास आतुरलेले जीव घरी घेतात धाव सर्वांच्या आग्रहास्तव घेते ….. . रावांचे नाव.

* संसाराचे टिपण हृदयाच्या वहीत……
ना आयुष्य मागते सुदृढ आरोग्यासहित.

* आकाशात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी……
च्या साथीने चढते संसाराची पायरी.

* जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने …….
रावांचे नाव घेते खऱ्याखुऱ्या प्रेमाने.

* सुख समाधान, शांती तेथे देवाची वस्ती ……….
ना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती.

* निळ्या-निळ्या आकाशात शोभून दिसतात चंद्र-तारे………रावांच्या संगतीने उजळले जीवन सारे.

* मनाला समाधान देते देवापुढची सांजवात संसाराच्या सुखी वाटचालीकरिता. .रावांच्या हाती दिला हात.

* संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती……
रावाशी लग्न झाले, झाली इच्छापूर्ती.

* गरिबीची करू नये निंदा, श्रीमंतीचा करू नये गर्व………
च्या नावावर अर्पिले जीवन सर्व.

* चांदीच्या तबकात ठेवले नवसाचे पेढे . …..
रावांच्या दर्शनाने मन झाले वेडे.

* हृदयात असावे प्रेम, प्रेमात असावी निष्ठा निष्ठेत असावी कृती, कृतीत असावी कला……… च्या संसारात काय कमी मला.

* पायातल्या जोडव्यात माहेरची स्मृती, मिळाले…….
पती म्हणून आभार मानू किती.

* गुलाबाचे फुल देवीला वाहिले ……
रावांच्या साथीने मी संसारात रमले.

* संसाररूपी सागरात प्रीतीच्या लाटा……
च्या सुखदुःखात उचलीन अर्धा वाटा.

* संसार करावा नेटका आणि युक्तीने …….
रावांचे नाव घेते अपार भक्तीने.

* संसाररूपी सागरात प्रेमरूपी सरोवर आयुष्याचा प्रवास करते….. रावांच्या सोबत.

* वसंत चाहुली हळदीकुंकू करतात सुवासिनी…….
रावांनी भरला आनंद जीवनी.

* चंद्राचा उदय, समुद्राला भरती, …….
च्या शब्दाने सारे श्रम हरती.

* सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले………
च्या संसारात भाग्य माझे हसले.

* सावित्रीच्या पातिव्रत्याने सत्यवानाला मिळाला पुनर्जन्म …. रावांचे सौभाग्यछत्र लाभो जन्मोजन्म.

* माहेर सोडताना पावलं होतात कष्टी …….
च्या संसारात करीन सुखाची वृष्टी.

* महादेवाला वाहतात बेल, कृष्णाला तुळशी ……….
रावांचे नाव घेते च्या दिवशी.

* किनखापांची गादी त्याला भरगच्च रेशमी लोड …….
रावांचे बोलणे अमृतासारखे गोड.

* स्त्रीला भूषविते तिची शालिनता………..
रावांच्या जीवनात करीन कर्तव्याची पूर्तता.

* नव्या दिशा नव्या आशा, नव्या घरी पदार्पण, …….
च्या जीवनी माझे सर्वस्व अर्पण.

* आला आला रुखवत त्यात होते लाडू, लाडवात होते मोतीचूर, मोतीचूर झाले खुसखुशीत,……. रावांचं नाव घेते येऊन भलत्या खुशीत.

* अत्तरदाणी गुलाबदाणी माळ घातली विडे ठेवले करून,…….. रावांना माळ घातली कुलस्वामिनीला स्मरून.

* स्वाती नक्षत्रातील थेंबाचे शिंपल्यात होती मोती ………
राव मिळाले पती म्हणून ईश्वराचे आभार मानू किती.

* रूप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा …..
चे नाव घेऊन आशिर्वाद मागते सर्वांचा.

* यज्ञ, धर्म, कीर्ती, ऐश्वर्य आणि संपत्ती …….
चे यश हीच माझी स्वप्नपूर्ती.

* उगवला सूर्य मावळली रजनी, ………
चे नाव सदैव माझ्या मनी.

* नूतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडवा ……
रावांच्या सान्निध्यात राहो सदैव गोडवा.

* श्यामल वर्ण मेघातून कोसळतात मोत्यांच्या सरी …..
रावांचं नाव घेते आले मी सासरी.

* लहानशा भिंती चित्र काढू किती
सासूबाईंच्या पोटी….
राव आहेत मोठी.

* जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने ….
रावांचे नाव घेते बायको या नात्याने.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top